“पेंशन अदालत अहवाल” दिनांक 18.09.2018
केंद्र
शासनाच्या निर्देशानुसार संपूर्ण देशातील प्रलंबित निवृत्तीवेतन प्रकरणाचा निपटारा
करण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाचे दिनांक 05.09.2018 चे
परिपत्रकानुसार सहसंचालक लेखा व कोषागारे
व महालेखाकार कार्यालय नागपूर यांचे संयुक्त विद्यमाने दिनांक 18.09.2018 रोजी साई
सभागृह, नागपूर यंथे “पेंशन आदालत”चे आयोजन करण्यात आले. सदरहु पेंश्न
अदालतीचे उद्घाटन सकाळी 9.00 वाजता श्री. दिनेश पाटील, महालेखाकार, नागपूर , श्री.
बिजू जोशेफ उपमहालेखाकार, श्री. विजय कोल्हे, सहसंचालक, लेखा व कोषागारे, नागपूर,
श्री. नागसेन बागडे, श्री. म.ना.बागडे, सहाय्यक संचालक, लेखा व कोषागारे, नागपूर ,
श्रीमती दिपाली भरणे, कोषागार अधिकारी, नागपूर, श्री. शैलेश कोठे, लेखाधिकारी,
श्रीमती मोनाली भोयर, लेखाधिकारी तथा
नोडल अधिकारी “पेंशन अदालत”, प्रियंका
पाठे, समन्वय कर्मचारी “पेंशन अदालत” यांचे
उपस्थितीत पार पडले.
“पेंशन अदालत” चे आयोजन
दोन सत्रामध्ये आयोजित केले होते. प्रथम सत्र सकाळी 9.00 ते 1.00 या कालावधीत
अमरावती व नागपूर विभागाकरीता व दुसरे सत्र दुपारी 1.00 ते सायंकाळपर्यंत औरंगाबाद
विभागाकरीता.
सदरहु सत्राकरीता जिल्हानिहाय रजिस्ट्रेशन
काऊंटर सकाळी 8.00 वजता पासून सुरु करण्यात आले होते. निवृत्तीवेतनधारकांच्या
तक्रारीकरीता वेगळे रजिस्ट्रेशन काऊंटर ठेवण्यात आले होते.आहरण व संवितरण अधिकारी
यांना टोकन क्रमांक देण्यात आले होते व टोकन क्रमांकानुसारच अडचणीचे निराकरण
उपस्थित एकूण 50 महालेखाकार कार्यालयाचे अधिकारी/कर्मचारी तसेच कोषागारातील एकूण 80 आधिकारी/कर्मचारी यांचे मार्फत करण्यात आले.
तिन्ही विभागातून एकूण 430 निवृत्तीवेतन
विषयक प्रकरणे 378 आहरण व संवितरण
अधिका-यांनी सादर केलीत. याव्यतिरीक्त 150 निवृत्तीवेतनधारकाच्या अडचणी देखील ऐकूण
घेण्यात आल्यात यामध्ये 100 हून अधिक निवृत्तीवेतन प्रकरणे अंतिम प्राधिकारपत्राकरीता
स्विकारण्यात आली तसेच 100 निवृत्तीवेतनविषयक प्रकरणे अंतिमीकरणाच्या
टप्प्यापर्यंत नेण्यात आलीत. सदरहु पेंशन अदालतीमध्ये जागीच 14 निवृत्तीवेतनविषयक
प्रकरणे निकाली काढूण प्राधिकारपत्र अदालती दरम्यानच संबंधीतांना देण्यात आले.
सदरहु अदालीतीमध्ये निवृत्तीवेतनधारक व आहरण व संवितरण आधिका-यांकरीता चहा पाणाची
व नास्त्याची व्यवस्था करण्यात आली होती तसेच महालेखाकार कार्यालयाचे प्रतिनिधी व
कोषागार प्रतिनिधी यांचेकरीता निवास व भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. सदरहु
पेंशन अदालतीचे संपूर्ण नियोजन कोषागार व सहसंचालक, लेखा व कोषागारातील 50 हून
अधिक कर्मचारीमार्फत पार पाडले. पेंशन अदालीतीचा
समारोप सायंकाळी 6.00 वाजता करण्यात आला.
No comments:
Post a Comment